ठाणे : हॉटेलमधील वेटर तसेच पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ग्राहकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डांचे क्लोनिंग करणाऱ्या दोघा ठकसेनांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.
शाबाज मोहंमद आरिफ खत्री उर्फ रेहान अली खान मुख्य आरोपी आहे. त्यानं देशभरातली अनेक शहरं आणि दुबईमधबून तब्बल १५ हजार कार्डांचं क्लोनिंग केल्याचं उघड झालंय. त्याचा साथीदार केशव मगता पात्रो उर्फ रेड्डी उर्फ सरकार यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
त्यांच्याकडून कार्ड क्लोन करण्याचे ३ स्कॅनर, लॅपटॉप, मोबाईल फोन जप्त करण्यात आलेत. २००७ पासून त्यांचा हा धंदा सुरू होता. टोळीतील आसिफ शेख, केशव रेड्डी उर्फ बाबू आणि मोहम्मद वरसुद्दीन अन्सारी हे तिघे फरार आहेत.