Kejriwal Arrested Supriya Sule Rohit Pawar Reacts: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचलनालयाने अटक केली आहे. कथित मद्यविक्री घोटाळाप्रकरणी गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आल्यानंतर विरोधकांनी उघडपणे टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केजरीवाल यांची अटक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अटक केल्याचा आरोप केला आहे. "केजरीवाल यांच्या अटकेचा मी तीव्र शब्दांमध्ये निषेध करतो. मोदी सरकार लोकशाहीचा गळा दाबत आहे. यापूर्वी असं कधीही घडलेलं नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या पारदर्शकेबद्दल चिंता वाटत आहे. आधी सोरेन यांनी अटक करण्यात आली. त्यानंतर आता केजरीवालांना बेड्या घालण्यात आल्या आहेत. उद्या अजून कोणाला अटक होईल, धोरण ठरवलं म्हणून अटक करणं पूर्णपणे चुकीचं आहे," असंही शरद पवार म्हणाले. विशेष म्हणजे शरद पवारांबबरोबरच त्यांची खासदार कन्या सुप्रिया सुळेंनीही या प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. शरद पवार यांचे नातून रोहित पवार यांनीही या विषयावरुन सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं आङे.
शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळेंनीही केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध केला आहे. "मी या प्रसंगी अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर उभी आहे. ही राजकीय हेतूने प्रेरीत अटक आहे. ईडीने ही अटक विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात मतदारांना कमी लेखण्याच्या उद्देशाने भाजप सरकारच्या आदेशानुसार केली आहे. आम्ही संवैधानिक लोकशाहीसाठी या लढ्यात एकत्र आहोत," असं सुप्रिया यांनी म्हटलं आहे.
I stand in solidarity with @ArvindKejriwal ji. This is yet another politically motivated arrest by the ED at the behest of the BJP Government to suppress the voice of the opposition & undermine the electorate at large. We are resilient and united in our fight for constitutional…
— Supriya Sule (@supriya_sule) March 21, 2024
शरद पवारांचे नातू आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही या अटकेवरुन मोदी सरकावर टीका केली आहे. "दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक ही अहंकाराचा कहर आहे. आज ही परिस्थिती असेल तर चुकून 2024 ला भाजपा सत्तेत आली तर संविधान आणि लोकशाही हे सर्वांना विसरावं लागेल. या काळात अरविंद केजरीवाल यांच्यासोबत महाराष्ट्राचीही स्वाभिमानी मराठी जनता आहे. या कारवाईवरुन मात्र एक स्पष्ट झालं की, भाजपा घाबरलीय," असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांनी, लडेंगे और जितेंगे असा हॅशटॅगही वापरला आहे.
नक्की वाचा >> केजरीवाल यांना जेलमधून मुख्यमंत्री म्हणून काम करता येईल का? कायदा काय सांगतो?
दिल्लीचे मुख्यमंत्री मा. अरविंद केजरीवाल यांची अटक ही अहंकाराचा कहर आहे…. आज ही परिस्थिती असेल तर चुकून २०२४ ला भाजप सत्तेत आली तर संविधान आणि लोकशाही हे सर्वांना विसरावं लागेल…
या काळात मा. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत महाराष्ट्राचीही स्वाभिमानी मराठी जनता आहे…
या कारवाईवरुन… pic.twitter.com/6kO9vgZVrl— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 21, 2024
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरुद्ध आम आदमी पार्टीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असून या याचिकेवर आज सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होणार आहे.