धनगरांपाठोपाठ लिंगायत समाजाकडूनही आरक्षणाची मागणी

मराठा तसेच धनगरांपाछोपाठ लिंगायत समाजाकडूनही आरक्षणाची मागणी पुढे आलीय.  

Updated: Dec 6, 2018, 12:04 AM IST

पुणे : मराठा तसेच धनगरांपाठोपाठ लिंगायत समाजाकडूनही आरक्षणाची मागणी पुढे आलीय. लिंगायत संघर्ष समितीची पत्रकार परिषद पुण्यात झाली. यावेळी लिंगायत समाजाला अल्पसंख्यक दर्जा देण्याबरोबरच समाजातील सर्व पोटजातींना आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. 

सरकारनं यासंदर्भात येत्या ३१ डिसेंबरच्या आत निर्णय घ्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा संघर्ष समितीतर्फे देण्यात आला. दरम्यान, ब्राह्मण समाजाला ही आरक्षण मिळालं पाहिजे, अशी मागणी झालीय. ही मागणी आता यासाठी जास्त गांभिर्याने घ्यावी असं वाटतंय. कारण, इतर समाजाकडून या ब्राह्मणांना आरक्षण मिळण्याची मागणी उचलून धारली जाते आहे. 

ब्राह्मणांना खरंच आरक्षणाची गरज आहे का? प्रगत म्हणून गणला गेलेला आणि वर्णव्यवस्थेत शोषक म्हणून हिणवला गेलेला हा समाज आज आरक्षण मागतोय याचा अर्थ समाजात नक्की काय बदल झालाय, याचीच चर्चा सुरु आहे.