पोलीस यंत्रणाच नव्हे, हवामान खातंही निवडणुकीसाठी सज्ज

अशी केली आहे खास तयारी ... 

Updated: Oct 19, 2019, 09:27 PM IST
पोलीस यंत्रणाच नव्हे, हवामान खातंही निवडणुकीसाठी सज्ज  title=

मुंबई : मुंबई पोलिसांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तयारी केली आहे. मुंबई आणि उपनगरातल्या ३६ विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. मतदान शांततेत पार पाडावं यासाठी तब्बल ४० हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यायाशिवाय २२ केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तुकड़्या, १२ सीआरपीएफच्या तुकड्या आणि २ हजार ७०० होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. 

३६ मतदारसंघात ९ हजार ८९४ पोलिंग बूथ आहेत. त्यातील ६९ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर, प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून १६४ जणांना तडीपारीची नोटीस बजावली आहे. सोशल मीडियावर पोलिसांचं विशेष लक्ष राहणार असून ड्रोनच्या माध्यमातून शहरातल्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. एकंदर सर्वच यंत्रणा ही विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं स्पष्ट होत आहे. 

हवामान खातंही सज्ज 

गेल्या काही दिवसांपासून या परिसरात होणारा अवेळी पाऊस पाहता परतीच्या वाटेवर निघालेला  हा वरुणराजा ऐन मतदानाच्या दिवशीही बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार हाच पाऊस मतदानाच्या दिवशीही असाच गोंधळ घालू शकतो.

श्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागत रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी विजांच्या कडकडाटासह आणि वादळीवाऱ्यासह पाऊस पडू शकतो तर मुंबईत पावसाची रिपरिप अशीच राहील त्यामुळे रविवार आणि सोमवार म्हणजेच मतदानाच्या दिवशी सोबत छत्र्या घेऊन बाहेर पडा आणि मतदान करा.