सोलापूर : 'गोपीचंद यांनी पवार साहेबांबद्दल असे शब्द वापरणे चुकीचे असून पवार हे आमचे शत्रू नसून राजकीय विरोधक आहेत. इथून पुढे शब्द जपून वापरावेत असा सल्ला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना दिला आहे.' आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा होता. या दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
सोबतच सुभाष देसाई यांच्यावर बोलताना ते म्हणाले की, त्यांनी राज्याच्या स्वप्नांची काळजी घ्यावी, माझ्या स्वप्नांची काळजी घेण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांनी आषाढीला विठ्ठलाची शासकीय पूजा करावी की नाही हे त्यांनी कोविडची परिस्थिती पाहता ठरवावं.
या दौऱ्यात त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमधील कोविड वॉर्डची स्थिती जाणून घेतली तसेच जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीवर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली.
शरद पवारांवर टीका करत असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा तोल घसरला आहे. पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. पडळकर यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे नेते आता आक्रमक झाले आहेत.