Election Result : देवरुखात कमळ फुलले, शिवसेनेला धक्का

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून रत्नागिरीची ओळख आहे. मात्र, देवरुख नगरपंचायतीमध्ये पुन्हा एकदा भाजपने बाजी मारली. विजयी उमेदवारांची यादी पाहा

Surendra Gangan Updated: Apr 12, 2018, 01:00 PM IST
Election Result : देवरुखात कमळ फुलले, शिवसेनेला धक्का title=

रत्नागिरी : शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून जिल्हाची ओळख आहे. मात्र, देवरुख नगरपंचायतीमध्ये पुन्हा एकदा भाजपने आपली सत्ता काबीज केलेय. देवरुखात भाजपचे कमळ फुलले आहे. येथे शिवसेनेला जोरदार धक्का दिलाय. भाजपने ७ जागा मिळवत सत्ता आपल्याकडे राखली आहे. शिवसेनेला ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर राष्ट्रवादीने ३ आणि काँग्रेस, मनसे, अपक्ष यांनी प्रत्येकी १ जागा मिळवेलय. दरम्यान, गुहागर नगरपंचायत निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाले आहे. विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांना शिवसेने जोरदार दे धक्का दिलाय. मात्र, माजी आमदार डॉ. विनय नातू यांना गुहागरात सत्ता स्थापन करता आलेली नाही.

नगराध्यक्षपद भाजपकडे

देवरुख नगरपंचायत नगराध्यक्षपदी मृणाल शेट्ये विजयी झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार स्मिता लाड - १९८१ यांचा पराभव केलाय. तर शिवसेना उमेदवार धनश्री बोरुकर यांना  २३१६ मते मिळालीत. मृणाल शेट्ये यांना २४३५ मते मिळालीत. 

देवरुख विजयी उमेदवार  

 १ प्रकाश मोरे - शिवसेना 
२ आश्विनी पाताडे -  भाजप 
३ रेश्मा किर्वे - भाजप 
४ वैभव पवार - शिवसेना 
५ संतोष केदारी - भाजप 
६ प्रफुल्ल भुवड - राष्ट्रवादी
७ सुशांत मुळ्ये - भाजप 
८ अनुष्का टिळेकर - शिवसेना 
९ प्रतिक्षा वणकुद्रे - कॉंग्रेस 
१० उल्हास नलावडे - राष्ट्रवादी
११ प्रेरणा पुसाळकर - राष्ट्रवादी
१२ सान्वी संसारे - मनसे

गुहागरात विनय नातूंना अपयश

दरम्यान,  गुहागर नगरपंचायत निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाले आहे. विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांना शिवसेने जोरदार दे धक्का दिलाय. मात्र, माजी आमदार डॉ. विनय नातू यांना गुहागरात सत्ता स्थापन करता आलेली नाही. भाजपने ६ जागांवर विजय मिळवलाय.  विरोधी पक्ष म्हणून भाजप काम पाहणार आहे. तर शहरविकास आघाडी प्रथमच सत्तेत असणार आहे.

माजी पंचायत समिती सभापती राजेश बेंडल आणि गुहागरमधील नागरिक यांनी स्थापन केलेली आघाडी यामध्ये आमदार भास्कर जाधव किंबहुना राष्ट्रवादीने दुखावलेले सगळे एकत्र आले. त्यांनी जाधव यांना जोरदार दणका देण्याचा निश्चिय केला. त्याला शिवसेनेकडून अधिक पाठबळ मिळाले. शिवसेनेने या शहर आघाडीला पाठिंबा दिला. त्यामुळे गुहागर निवडणुकीत जाधव यांना पराभवाचा धक्का बसलाय. केवळ राष्ट्रवादीचा अधिकृत एकच उमेदवार निवडून आलाय.