भंडारा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव होईल: धनंजय मुंडे

धनंजय मुंडे हे जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात सभेदरम्यान बोलत होते

Updated: May 23, 2018, 08:33 PM IST

भंडारा: उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल पाहता असाच निकाल भंडारा गोंदिया जिल्ह्यात लागेल असा विश्वास विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. भंडारा जिल्यातील लाखनी तालुक्यात सभेदरम्यान ते बोलत होते.  ही निवडणूक केवळ निवडणूक नसून येत्या २०१९ लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम आहे, त्यामुळे भाजप सरकारला धडा शिकवा असं आवाहन यावेळी त्यांनी मतदारांना केलं.