धुळ्याच्या बाम्हणे गावात ढगफुटी, पुराच्या पाण्याचं थैमान

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातल्या बाम्हणे गाव परिसरामध्ये ढगफुटी झाली आहे.

Updated: Jun 30, 2019, 06:30 PM IST
धुळ्याच्या बाम्हणे गावात ढगफुटी, पुराच्या पाण्याचं थैमान title=

धुळे : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातल्या बाम्हणे गाव परिसरामध्ये ढगफुटी झाली आहे. बाम्हणे गावात पुराच्या पाण्याने अक्षरशः थैमान घातलं आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या गावालगत असलेल्या महामार्गाचं काम तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीनं न झाल्यामुळे हे संपूर्ण गाव जलमय झालं.

शंभराहून अधिक शेतकऱ्यांची शेतं या ढगफुटीमुळे खरडून निघाली आहेत. बाम्हणे गावांमध्ये रस्त्यांवर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. अनेकांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू वाहून गेलेल्या आहेत. या पुराच्या पाण्यात कुठलीही जीवित हानी झालेली नसली, तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान बाम्हणे आणि धमाने परिसरात झालेल आहे.

तर धुळे तालुक्यातील ढाडरे गावात वीज पडून एका तरुणीसह तीन बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अर्चना ठाकरे असं १७ वर्षांच्या मृत तरुणीचं नाव आहे.