धुळे पालिका निवडणूक : गुजरातमधील मतदान यंत्र नको, निवडणूक आयोगाकडे तक्रार

गुजरात आणि जळगाव येथे निवडणुकीसाठी वापरलेली मतदान यंत्र धुळे महापालिका निवडणुकीत नको. ही मतदान यंत्रे बदलण्यात यावीत तसेच व्हीपीटी मशीनचा वापर करावा, अशी मागणी करण्यात आलेय.

Updated: Dec 4, 2018, 11:22 PM IST
धुळे पालिका निवडणूक : गुजरातमधील मतदान यंत्र नको, निवडणूक आयोगाकडे तक्रार title=

धुळे : येथील महानगरपालिका निवडणुकीत दुसऱ्या ठिकाणी निवडणुकीसाठी वापरलेली यंत्रे वापरु नये, अशी मागणी जोर धरु लागली आहे. दरम्यान, गुजरात आणि जळगाव येथे निवडणुकीसाठी वापरलेली मतदान यंत्र धुळे महापालिका निवडणुकीत नको. ही मतदान यंत्रे बदलण्यात यावीत तसेच व्हीपीटी मशीनचा वापर करावा, अशी मागणी करण्यात आलेय.

गुजरात आणि जळगावमध्ये वापरलेली मतदान यंत्र धुळ्यात वापरू नयेत या मागणीसाठी आमदार कुणाल पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी निवडणूक आयोगाकडे केलेय. याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी आघाडीचे प्रमुख नेतेही उपस्थित होते. शिवाय सर्वच मशीनच्या चाचणीची मागणी महापौर कल्पना महाले यांनी केलीय. तर आयोगाने दोन मशीनवरच प्रात्याक्षिक करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे येथे वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

धुळे महानगरपालिकेत वापरली जाणारी मतदान यंत्र हे गुजरात आणि जळगाव येथे वापरलेली असल्याने ती बदलावित तसेच व्हीपीटी मशीनचा वापर करावा, ही मागणी निवडणूक अधिकारी सुधाकर देशमुख यांच्याकडे करण्यात आलेय. दरम्यान, आधीच्या दोन निवडणुकीसाठी ही मतदान यंत्रे वापरण्यात आल्याने संशय व्यक्त होत आहे. 

तसेच सर्वच मशीनची चाचणीची मागणी महापौर कल्पना महाले यांनी केली. मात्र आयोगाने दोन मशीनवर ती प्रात्यक्षिक करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शंका दूर करण्याचा निर्णय आयोगाने  घेतला आहे. तसेच प्रचार संपल्यानंतर मतदान संपेपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात राहील, यासाठी आयोगाने योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणीही यावेळी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.