'राज ठाकरे - यूपीच्या टॅक्सीवाल्यांचा डीएनए एकच' - डॉ.स्वामी

भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी खळबळजनक वक्तव्य शनिवारी येथे केले. 

Updated: Oct 30, 2017, 12:36 AM IST
'राज ठाकरे - यूपीच्या टॅक्सीवाल्यांचा डीएनए एकच' - डॉ.स्वामी  title=

डोंबिवली :  भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी खळबळजनक वक्तव्य शनिवारी येथे केले. 

डॉ. सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, 'आपल्या देशातील हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच आहे. उत्तर प्रदेश, बिहारींविरूद्ध मनसेप्रमुख राज ठाकरे आंदोलने करतात. पण एके दिवशी मला ठाकरे यांचा केस सापडला. त्याचा डीएनए हैदराबादला तपासासाठी पाठवला असता त्यांचा आणि यूपीवाल्या टॅक्सीचालकाचा डीएनए एकच असल्याचे दिसून आले. तसे असेल तर राज ठाकरे हेही उत्तर प्रदेशातून आल्याचे स्पष्ट होते'.

आपल्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, आर्य खैबरखिंडीतून आले, त्यांनी द्रविडांना हरविले हा खुळचट शोध इंग्रजांनी आपल्यावर लादला. गैरहिंदू लोक म्हणजे मुस्लीम आणि इतर हे वस्तुत: हे हिंदूच होते. डीएनएचा आधार घेतल्यास सगळ्या भारतीयांचा डीएनए एकच असल्याचे उघड होईल, असे सांगताना त्यांना राज ठाकरे यांच्या डीएनएचा संदर्भ दिला.

हिंदुस्थान हा शब्द हिमालय आणि हिंदू सागर या दोन शब्दां'तून तयार झालेला आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं, तर विराट हिंदुस्थान संगम आणि रोटरी क्लबतर्फे 'विचार वेध' या व्याख्यानात 'भारत-उभरते जागतिक नेतृत्व अर्थात एक पाऊल रामराज्याच्या दिशेने' या विषयावर ते बोलत होते.