राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजय भाजपच्या वाटेवर?

राधाकृष्ण विखे-पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सलोख्याचे सबंध असल्याने विखे-पाटील भाजपत जातील, अशी चर्चा नेहमीच राजकीय वर्तुळात सुरु असते.

Updated: Dec 26, 2018, 01:31 PM IST
राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजय भाजपच्या वाटेवर? title=

नगर - लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने राजकीय पटलावर सातत्याने काही ना काही घडामोडी घडत आहेत. आता इच्छुकांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली असून, आपल्याला ज्या पक्षातून तिकीट हवे आहे, त्यामध्ये प्रवेश करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा डॉ. सुजय भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यातच आज त्यांनी माझे वडील जरी काँग्रेसचे नेते असले, तरी मला माझा पक्ष निवडीचा अधिकार आहे, असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. डॉ. सुजय विखे-पाटील अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार का आणि भाजप त्यांना नगरमधून उमेदवारी देणार का हे पाहणे येत्या काळात औत्सुक्याचे असेल.

राधाकृष्ण विखे-पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सलोख्याचे सबंध असल्याने विखे-पाटील भाजपत जातील, अशी चर्चा नेहमीच राजकीय वर्तुळात सुरु असते. त्यातच डॉ. सुजय यांनी काँग्रेसने तिकीट देवो अथना न देवो मी लोकसभेची निवडणूक लढविणारच असल्याचे वेळोवेळी म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर आज डॉ. सुजय यांनी माझे वडील जरी काँग्रेसचे नेते असले तरी मला मला माझा पक्ष निवडीचा अधिकार आहे. मला स्वतंत्र नेतृत्त्व मान्य असेल, तर मी त्या नेतृत्त्वाकडे जाईन. त्यास माझ्या कुटुबाचा विरोध असला तरीही मी माझा निर्णय घेईन. वडील काँग्रेसमध्ये आहेत म्हणून मी काँग्रेसमध्ये राहिले पाहिजे, असे मला वाटत नाही, असे वक्तव्य डॉ. सुजय विखे यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.