close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Video: नाशिक-नंदुरबार एसटी बसचा ब्रेक फेल, चालकाने अशी थांबवली बस

बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा अपघात

Updated: Feb 12, 2019, 02:06 PM IST
Video: नाशिक-नंदुरबार एसटी बसचा ब्रेक फेल, चालकाने अशी थांबवली बस

नाशिक : धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर टोल नाक्याजवळ एक मोठा अपघात एसटी महामंडळाच्या बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळला आहे. नाशिकहून पिंपळनेरकडे जाणाऱ्या नाशिक नंदुरबार या एसटी बसचा पिंपळनेर टोल नाक्याजवळ आल्यानंतर अचानक ब्रेक निकामी झाला. यावेळी एसटी बसच्या पुढे एक कार होती. कारचा वेग थोडा कमी होता तर ब्रेक निकामी झाल्यामुळे वेगात होती. अशावेळी बस कारवर जाऊन धडकली असती तर मोठा अपघात झाला असता. मात्र बस चालकाने क्षणाचाही विलंब न लावता बस ही फुटपाथवर चढवत पुढे नेली. पुढे गिअर बदलून चालकानं बस नियंत्रित केली. या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांसह कारमधील प्रवाशांचे प्राण वाचवले. पिंपळनेर गावाजवळील टोलनाक्यावरील ही घटना असून ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे.