पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांचं ब्रेन हॅमरेज झालेला नाही, तर त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे, यानंतर डीएसके यांच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत, यानंतर त्यांना इतर खासगी रूग्णालयात उपचारासाठी हलवलं जाण्याची शक्यता आहे.
पोलीस कोठडीत तोल जाऊन जमीनीवर डीएसके कोसळले होते. यानंतर डीएसकेंना तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डीएसकेंचं ब्रेन हॅमरेज झाल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे त्यांचं एमआरआय आणि सीटी स्कॅन करण्यात आलं. या दोन्ही चाचण्यांचे रिपोर्ट नॉर्मल आले आहेत.
सध्या डीएसकेंची प्रकृती स्थिर आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके पोलिसांच्या अटकेत आहेत. शनिवारी न्यायालयाने डीएसकेंना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. कोठडी दरम्यानच डीएसकेंचा पोलीस कोठडीत तोल गेला आणि ते कोसळल्याची माहिती समोर येतेय.