कोरोना व्हायरसच्या धास्तीने वृद्ध महिलेची आत्महत्या

कोरोना व्हायरसच्या धास्तीने वृद्ध महिलेची आत्महत्या

Updated: Mar 28, 2020, 07:53 AM IST
कोरोना व्हायरसच्या धास्तीने वृद्ध महिलेची आत्महत्या

कोल्हापूर : सध्या देशावर कोरोनाचे संकट ओढावले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे महत्वाची पाऊलं उचलली जात आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच यासंदर्भातील महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु राहतील त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार सांगत आहेत. असे असताना कोरोना व्हायरसच्या धास्तीने वृद्ध महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात समोर आला आहे. मालुताई आवळे असे या वृद्ध महिलेचं नाव

कोल्हापूर जवळील शिये इथे हा प्रकार घडला.शिये पुलावरून पंचगंगा नदीत उडी घेत त्यांनी आपला जीवन प्रवास संपवला. गुरुवारी त्यांचा मृतदेह सापडला.
कोरोनाच्या भीतीने आत्महत्या केली असल्याची माहिती त्यांच्या मुलाने पोलिसांना दिली आहे.