मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. पावसानं कोकण (konkan) आणि पश्चिम महाराष्ट्रात (Westran maharashtra) अक्षरश: थैमान घातलंय. काही ठिकाणी दरड कोसळून (landslide) अनेकांचा मृत्यू झाला. अनेकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं. संसार उद्धवस्त झाला. आपले कुटुंबिय गमावले. राज्यातील विविध दुर्घटनांमुळे आतापर्यंत एकूण 129 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी दिली आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भितीही व्यक्त केली जात आहे. (due to heavy rain and landslide 129 killed in various incidents in the konkan and Westran maharashtra)
थोरात काय म्हणाले?
"यावेळी दरड कोसळण्याच्या घटना खूप मोठ्या प्रमाणात घडल्यात. तळीये गावातील मृत्यूचा आकडा अजून वाढू शकतो. राज्यात आतापर्यंत एकूण 129 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवार (22 जुलै) आणि आज (23 जुलै) राज्यभरात 129 जणांचा मृत्यू झालाय", असं थोरातांनी स्पष्ट केलं.
"आमची सगळी यंत्रणा फिल्डवर आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी काम करतायेत. पुरानंतर मदत करणेही जिकरीचे आहे. स्वच्छता करण्याचं महत्त्वाचं काम यापुढेही असेल", असंही नमूद केलं.
महाडमध्ये आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू
रायगडच्या महाडमध्ये सर्वात मोठी दुर्घटना घडलीयं. तळीये गावात दरड कोसळून 38 जणांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत राज्यात दरडी कोसळून 45 ते 50 जणांचा मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यातल्या मिरगावात दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. साताऱ्यात पाटणमधील आंबेघर गावामध्ये दरड कोसळल्यानं अनेक जण ढिगाऱ्याखाली दबले आहेत.
राज्यातील विविध दुर्घटनांमध्ये 129 जणांचा मृत्यू, @bb_thorat यांची माहिती. #Raigad #KonkanFloods #Rain pic.twitter.com/aUEsIdPqFr
— Sanjay Patil (@patil23697) July 23, 2021
पाटण तालुक्यात 26 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. तर खेडमधील पोसरे गावातही 6 घरं गाडली गेली. त्यामुळे 17 जण आणि काही जनावरं ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त होतीय.
सातारा जिल्ह्यातल्या मिरगावात दरड कोसळून 12 मृत्यू झाल्याची माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलीय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होतीय.
मिरगाव, कामरगाव या दोन ठिकाणी घरांवर दरड कोसळलीय. दुर्गम ठिकाण असल्यानं मदतकार्य करण्यात अडथळे येतायेत. एनडीआरएफ, नेव्ही दोन्ही टीम पोहोचू शकलेल्या नाहीत.