दुरांतो रेल्वे अपघात : ६ कामगार जखमी, अशी लोकल सेवा सुरु

मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कसारा येथे माती आणि दरड रुळावर आल्याने  नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला अपघतात झाला. गाडीचे नऊ डब्बे घसरले. त्यामुळे वाहतूक ठप्प आहे. दरम्यान, रुळावरील दरड हटविताना रेल्वेचे सहा कंत्राटी कामगार जखमी झालेत. तसेच लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्यात तर काही वळविण्यात आल्यात.

Updated: Aug 29, 2017, 01:05 PM IST
दुरांतो रेल्वे अपघात : ६ कामगार जखमी, अशी लोकल सेवा सुरु title=

आसनगाव : मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कसारा येथे माती आणि दरड रुळावर आल्याने  नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला अपघतात झाला. गाडीचे नऊ डब्बे घसरले. त्यामुळे वाहतूक ठप्प आहे. दरम्यान, रुळावरील दरड हटविताना रेल्वेचे सहा कंत्राटी कामगार जखमी झालेत. तसेच लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्यात तर काही वळविण्यात आल्यात.

कसारा येथे रुळावरील माती बाजुला करताना डोक्यात ओव्हरहेड वायर पडल्याने रेल्वेचे सहा कंत्राटी कामगार जखमी झालेत. ही घटना रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे बोलले जात आहे.

अशी लोकल सेवा सुरु

 दरम्यान, सीएसटी ते टिटवाळा आणि कसारा ते आसनगाव लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे. काही लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही अन्य मार्गे वळवल्या आहेत.रेल्वे सेवा पूर्ववत होण्यास उद्याची सकाळ उजाडेल, असे सांगण्यात येत आहे.

या गाड्या रद्द आणि पुणेमार्गे

मुंबई हून सुटणाऱ्या  गाड्या पुणेमार्गे मनमाडला वळवण्यात आल्या आहेत.

- 12859- सीएसटी-हावडा गीतांजली एक्सप्रेस

- 17617- मुंबई - नांदेड तपोवन एक्सप्रेस 

-12336- एल टी टी-भागलपुर एक्सप्रेस 

- 15017- एलटीटी- वाराणसी काशी एक्सप्रेस 
- 22129- एलटीटी - अलाबाद तुलसी एक्सप्रेस 

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा फटका रेल्वेला बसला आहे. सायन येथे रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली आहे. तसेच पावसामुळे मध्य रेल्वेची  वाहतूक  विस्कळीत झाल्याने मनमाड स्थानकावर  सेवाग्राम आणि जनशताब्दी  एक्सप्रेस थांबविण्यात आल्या आहेत. रेल्वे  प्रशासनाकड़ून  कुठल्याही पुढील प्रवासाबाबत  मार्गदर्शन  होत नसल्याने प्रवाश्यांचे  हाल होत  आहेत.