खडसेंकडून अंजली दमानियांविरोधात तक्रार

अंजली दमानिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल...  

Updated: Jun 13, 2018, 03:16 PM IST

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात जळगावच्या  मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महत्त्वाचं म्हणजे एकनाथ खडसे यांनी स्वतःच अंजली दमानियांविरोधात तक्रार केलीय. अंजली दमानियांवर फसवणूक, बनावट दस्ताऐवज तयार करणं आणि दस्ताऐवज चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 
गेली दोन वर्षं मला ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय, त्यांना आता आपण छळणार, माझा संघर्ष सुरूच राहणार असं एकनाथ खडसेंनी यावेळी म्हटलंय.