खडसेंची सरकारवर टीका पण अजित पवारांची स्तुती

राज्य सरकारच्या कारभारावर पुन्हा टीका करत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या कार्यशैलीची मात्र स्तुती केली.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 11, 2018, 03:26 PM IST
खडसेंची सरकारवर टीका पण अजित पवारांची स्तुती title=

जळगाव : राज्य सरकारच्या कारभारावर पुन्हा टीका करत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या कार्यशैलीची मात्र स्तुती केली.

कामावर असमाधानी

सरकार आपलं असलं तरी सरकारच्या कामावर आपण अजिबात समाधानी नसल्याची टीका माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी जळगावात केली आहे. शेतीची अवस्था अतिशय खराब असून आपल्यालाही त्याचा फटका बसतो आहे असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.

शेतीचा विकास नाही

ज्या वेगानं शेतीचा विकास व्हायला होता तो सरकारकडून होताना दिसत नाही आहे. त्यामुळं सरकारच्या भरवश्यावर विसंबून राहू नका असं सांगत निर्णय क्षमता असलेली माणसं मंत्रिमंडळात नाहीत असा टोला देखील खडसेंनी लगावला. दरम्यान, अजित पवार हे निर्णय क्षमता असणारे नेते आहेत अशी स्तुती देखील एकनाथ खडसे यांनी केली आहे.