शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष - एकनाथ खडसे

अत्यंत कमी रक्कमेच्या कर्जापायी राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढताहेत,

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 28, 2018, 11:24 PM IST
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष - एकनाथ खडसे

मुंबई : अत्यंत कमी रक्कमेच्या कर्जापायी राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढताहेत,

या वाढत्या शेतकरी आत्महत्या सरकारसाठी शरमेची बाब असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे अलीकडच्या सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची खंत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी जाहीर कार्यक्रमात व्यक्त केली. शहरी भागासाठी भरपूर योजना सरकारने आणल्या असतीलही परंतु, जगाचा पोशिंदा म्हणविणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, आपणही अर्थमंत्री होतो त्यामुळं पैशांचा हिशोब आपल्याला माहिती आहे,

बोंडअळीच्या नुकसानभरपाई दिली गेली पाहिजे, असेही खडसे यावेळी सरकारला उद्देशून म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी खडसेंनी जाहीरपणे खंत व्यक्त केली.