एकनाथ खडसे महाआघाडीच्या संपर्कात- सूत्र

एकनाथ खडसे भाजपला रामराम ठोकणार?

Updated: Dec 13, 2019, 01:10 PM IST
एकनाथ खडसे महाआघाडीच्या संपर्कात- सूत्र title=

मुंबई : भाजपमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे महाआघाडीच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे एकनाथ खडसे नाराज आहेत. गोपीनाथ गडावर काल एकनाथ खडसेंनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली. नाराज खडसे पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. गोपीनाथ गडावरील भाषणात देखील त्यांनी याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

काँग्रेस नेते आणि मंत्री नितीन राऊत यांनी देखील भाजपमध्ये मोठा भूंकप होणार असल्याचं संकेत दिले आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे हे भाजपला सोडून जातील अशी शक्यता आहे. पण ते नेमके कोणत्य़ा पक्षात जातील अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

गोपीनाथ गडावरुन खऱ्या अर्थानं एकनाथ खडसे यांची तोफ धडाडली. एकनाथ खडसेंनी थेट फडणवीसांवर आरोप केले. आपल्या पक्षातील स्थानाबाबत नाराजी व्यक्त करत उपस्थित कार्यकर्त्यांना थेट वेगळा पक्ष काढला तर असा सवालच उपस्थित केला. इतकंच नाही तर आता जास्त बोललो तर पक्षातर्फे आता शिस्तभंगाची कारवाई होईल असा टोलाही खडसेंनी लगावला.

एकनाथ खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला. आज गोपीनाथराव असते तर माझावर अशी वेळ आली नसती. चूक नसताना आम्ही वनवास भोगतो आहे. माझ्या राजकीय आयुष्यातील चार वर्ष खराब केली. आम्ही असं कोणतं पाप, कोणती चूक केली आहे हे तरी सांगावं असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. 

खडसेंनी म्हटलं की, आम्हाला कितीही छळलं तरी आम्ही तुमच्यासोबत राहू, असं मी नाही महादेव जानकर म्हणत आहेत. जनसंघापासून जेव्हा भाजपची स्थापना झाली. तेव्हापासूनची वाटचाल आम्ही पाहिली. आधी शेटजी भटजींचा पक्ष म्हणून हिणवलं जात होतं त्या पक्षाला बहुजनांचा पक्ष बनवण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं.' असं ही त्यांनी म्हटलं.

'मुंडे साहेबांनी कधी पाठीत खंजीर खूपसला नाही. बोलायचं तर समोर बोलायचे. हम तो डुबेंगे सनम पर तुमको भी लेकर डुबेंगे असं मुंडे साहेब म्हणाय़चे. पण तसं मी केलं नाही. पक्ष मला ही प्रिय आहे. पण आज जे पक्षाचं चित्र आहे तर जनतेला मान्य नाही. तु निवडून येशील असं म्हणायचं आणि दुसऱ्याला हात द्यायचा. आपल्याच लोकांनी आपल्याया उद्धवस्त करण्याचं काम केलं. आम्हाला पाडण्याचं पाप तुम्ही केलं. तर आम्ही काय करायचं सांगा. पंकजाताई पक्ष सोडणार नाही. पण माझा भरवसा धरु नका. पक्षामध्ये राहून जर अशी वागणूक देत असाल तर पक्षाबाहेर राहून कशी वागणूक द्याल. तुम्ही पक्षाबाहेर जा असंच त्यांना सांगायचं आहे. मुंडे साहेब असते तर मी मुख्यमंत्री झालो असतो.' असं देखील खडसेंनी म्हटलं.