Eknath Khadse:एकनाथ खडसेंना झटका; घोटाळ्याचे आरोप, अधिकाऱ्यांचे पथक जळगावात दाखल

राष्ट्रावादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंवर (Mandakini Khadse) मोठ्या घोटाळ्याचा आरोप केला होता. आता या भ्रष्टाचार प्रकरणातील जमीनीचे क्षेत्र मोजण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक जळगावात दाखल झाले आहे.  खडसेंनी उत्खनन केलेलं क्षेत्र मोजण्यासाठी इटीएस मोजण्यासाठी  अधिकाऱ्यांचे पथक जळगाव मधील मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले आहे. 

Updated: Jan 2, 2023, 05:29 PM IST
Eknath Khadse:एकनाथ खडसेंना झटका; घोटाळ्याचे आरोप, अधिकाऱ्यांचे पथक जळगावात दाखल title=

Eknath Khadse :  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे(eknath khadse).  हिवाळी अधिवेशनामध्ये मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी राष्ट्रावादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंवर (Mandakini Khadse) मोठ्या घोटाळ्याचा आरोप केला होता. आता या भ्रष्टाचार प्रकरणातील जमीनीचे क्षेत्र मोजण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक जळगावात दाखल झाले आहे.  खडसेंनी उत्खनन केलेलं क्षेत्र मोजण्यासाठी इटीएस मोजण्यासाठी  अधिकाऱ्यांचे पथक जळगाव मधील मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले आहे. 

एकनाथ खडसे यांच्या पत्नीच्या नावे असणाऱ्या आणि खडसे कुटुंबीयांच्या 33 हेक्टर 41 आर जमीनीवरून उत्खनन करून 400 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता. 
विधानसभेत याबाबत लक्षवेधी मांडण्यात आली होती. आणि या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची मागणी आमदारांनी केली होती.. त्यानंतर राज्य सरकारनं याची दखल घेतलीय. आणि आज इटीएस मोजण्यासाठी  अधिकाऱ्यांचं पथक मुक्ताईनगरात दाखल झालंय.

खडसेंवर  नेमका काय आरोप झालाय? 

मुक्ताईनगर तालुक्यामधील सातोड येथील 33 हेक्टर 41 आर जमिनीमधून करण्यात आलेल्या उत्खननाचा मुद्दा चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. यामध्ये, मंदाकिनी खडसे यांच्या नावावर सातोडमध्ये 33 हेक्टर 41 आर जमीन खरेदी करण्यात आली. संपूर्ण शिवार शालेय कामासाठी बिनशेती परवाना म्हणजेच (NA) करून घेण्यात आल्याचा आरोप पाटील यांनी केला होता. 

जानेवारी 2019 ला आधीच एनए झालेल्या शेतीला पुन्हा कृषक करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला. काही दिवसांमध्येच प्रांताधिकार्‍यांनी याला तात्काळ शेतीसाठी परवानगी दिली. यामुळे महसूल खात्याच्या आशिर्वादाने शालेय प्रयोजनासाठी असलेल्या या शेतीला पुन्हा कृषक करण्यात आले. यानंतर याच ठिकाणावरून अवैध गौणखनिज उत्खनन करण्यात आले. 10 हजार ब्रासच्या उत्खननाची परवानगी होती मात्र तिथून लाखो ब्रास मुरूमासह अन्य गौणखनिजांचं उत्खनन करण्यात आलं. यामधून 400 कोटी रूपयांचा  भ्रष्टाचार झाल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी केलेले आरोप खडसेंनी फेटाळले होते. 20 हजार ब्रासची रॉयल्टी आधीच भरण्यात आलीय असं खडसे म्हणाले. या आरोपानंतर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यांनतर आता थेट चौकशी पथक जळगावात दाखल झाले आहे.