Electricity Price Hike: ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना वीज दरवाढीचा 'शॉक'; प्रति युनिट 'इतक्या' रुपयांनी वीज महागणार

Mumbai Electricity Price Hike: एकीकडे गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या तर दुसरीकडे अवतकाळी पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाज्यांच्या ही किंमतीत वाढ झाली आहे. त्यातच आता ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्यांना दरवाढीचा शॉक सहन करावा लागणार आहे. 

Updated: Apr 2, 2023, 12:43 PM IST
Electricity Price Hike: ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना वीज दरवाढीचा 'शॉक'; प्रति युनिट 'इतक्या' रुपयांनी वीज महागणार
Electricity Bill Hike

Mumbai Electricity Rate Hike From 1st April: महाराष्ट्रात सर्वसामान्यांना महागाईचा (Inflation 2023 ) मोठा फटका बसला आहे. गॅस सिलिंडरच्या दरात वाढ (Increase gas cylinder rates), पेट्रोल-डिझेल आणि सोने-चांदीच्या दरात चढ-उतार, तर अवकाळी पावसामुळे भाज्यांचे दर आवक्याबाहेर जात असताना आता आणखी झटका सर्वसामान्यांना बसणार आहे. ऐन उन्हाच्या कडाक्यात महागाईच्या झळा सोसणाऱ्या वीज ग्राहकांच्या खिसा वीज दरवाढीने (Electricity price hike) कापला जाणार आहे. या दरवाढीचा टाटा पॉवरच्या ग्राहकांना फटका बसणार आहे. 

यासंदर्भात वीज नियामक आयोगाने (Electricity Regulatory Commission) शनिवारी रात्री उशीरा अदानी इलेक्ट्रिसिटी (Adani Electricity), टाट पॉवर (Tata Power) आणि बेस्टच्या वीज दरवाढीला (BEST electricity price hike) मंजूरी दिली असून ही दरवाढ शनिवारी (1 April 20230) पासून लागू झाली. परिणामी उन्हाच्या झळा आणखी तीव्र होत असताना एसी, कुलर आणि पंख्याची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे तुम्हाला या उन्हाळ्यात जास्त विजबिल भरावं लागण्याची शक्यता आहे. तुमचे बजेट देखील कोलमडू  शकते. सध्या अदानी इलेक्ट्रिसिटीचा प्रतियुनिटचा वहन आकार 1.47 रुपये होता. तो आता 2.21 रुपये होणार आहे. टाटा प्रतियुनिटचा वहन आकाप 1.47  वरून 1.68 रुपये एवढा झाला आहे. तर बेस्टच्या वीज वहन आकारातही 30 पैशांची वाढ झाली आहे. त्याचा फटका आता ग्राहकांना बसणार आहे. 

वाचा: सोन्याचे रेकॉर्डवर रेकॉर्ड ब्रेक! 10 ग्रॅमची किंमत ऐकून तुम्हाला बसेल धक्का, पाहा तुमच्या शहरातील दर 

दरम्यान मुंबई उपनगरात वीज वितरण (Electricity distribution in Mumbai suburbns) करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटी (Adani Electricity), टाटा पॉवर (Tata Power) , मुंबई शहरासाठी बेस्टने एमईआरसीकडे मागील थकबाकीसह 2023-24 आणि 2024-25 चे दर निश्चित करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. त्यावर जनसुनावणी घेतल्यानंतर आयोगाने आपला निर्णय जाहीर केला. त्याचा भार घरगुती ग्राहकांसह बहुतांश औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांवर पडणार आहे. 

त्यानुसार अदानी इलेक्ट्रिसिटीच्या घरगुती ग्राहकांच्या वीजदरात मोठी वाढ करण्यात आली असून, ग्राहकांना प्रति युनिट 75 पैसे 40 पैसे जास्त मोजावे लागणार आहेत. टाटा पॉवरच्या वीज दरात सर्वाधिक वाढ झाली आहे. त्याच्या 0-100 युनिट वीज असलेल्या सौर पॅनेलचा सध्याचा दर रु. 1.70 असेल. तो येतो 3.05 रूपये अवधा झाला आहे. मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीयांना प्रति युनिट सुमारे अडीच रुपये वाढ मोजावी लागणार आहे. अदानी आणि टाटा पॉवरने ग्राहकांसाठी निश्चित दरात पाच रुपयांनी वाढ केली आहे.