पुण्यात सातव्या मजल्यावरून उडी घेऊन तरूणीची आत्महत्या

पुण्यात घडलेल्या एका घटनेने सर्वांनाच धक्का बसलाय. पुण्याच्या मुंढवा परिसरात ही घटना घडलीये.

Updated: Jan 29, 2018, 02:35 PM IST
पुण्यात सातव्या मजल्यावरून उडी घेऊन तरूणीची आत्महत्या title=

पुणे : पुण्यात घडलेल्या एका घटनेने सर्वांनाच धक्का बसलाय. पुण्याच्या मुंढवा परिसरात ही घटना घडलीये.

कुठे काम करायची तरूणी?

मुंढवा येथील आयटी कपनीत काम करणा-या २२ वर्षीय तरुणाने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (२९ जानेवारी) सकाळी उघडकीस आला. अश्विनी गवारे (वय-२२, रा.शिरूर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. 

मागील काही दिवसांपासून रजेवर

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत अश्विनी ही मुंढव्यातील ग्लोबल टॅलेंट ट्रॅक या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीस होती. मागील काही दिवसांपासून ती रजेवर होती. आज सकाळी ती कामावर हजर झाल्यानंतर काही वेळात त्याच इमारतीच्या सातव्या मजल्यावर गेली आणि खाली उडी मारून आत्महत्या केली.

घरगुती वाद?

दरम्यान, तीने आत्महत्या का केली याची माहिती अद्याप कळु शकली नसली तरी घरगुती वादातून तिने आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. मुंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सूरू आहे.