नोटबंदी होऊन 6 वर्ष झालं तरी नोटा बदलल्याच नाहीत; 112 कोटींच्या नोटा सांभाळताना बँकवाले परेशान

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेप्रमाणेच राज्यातल्या आठ जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जुना नोटा अद्याप पडून आहेत. ज्याची एकूण रक्कम सुमारे 112 कोटी रुपये इतकी आहे. 

Updated: Nov 16, 2022, 09:56 PM IST
नोटबंदी होऊन 6 वर्ष झालं तरी नोटा बदलल्याच नाहीत; 112 कोटींच्या नोटा सांभाळताना बँकवाले परेशान  title=

रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी नोटबंदीचा(demonetisation) निर्णय जाहीर केला आणि रातोरात जुन्या नोटा रद्दीत जमा झाल्या.  नोटबंदीचा निर्णय होऊन आता तब्बल सहा वर्षे झाली आहेत. सहा वर्षापासून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील(Sangli District Central Bank) 14 कोटी 75 लाख रुपयांच्या जुन्या नोटा धुळ खात पडून आहेत. या कोट्यावधीच्या नोटा सांभाळताना बँकचे कर्मचारी परेशान झाले आहेत. 

14 कोटी 75 लाखांच्या नोटा जिल्हा मध्यवर्ती बँकेत धूळखात पडून

नोटाबंदीच्या निर्णयाला सहा वर्ष पूर्ण झालेली आहेत. मात्र अद्यापही सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील जुन्या नोटा बदलून मिळाल्या नाहीत. एक-दोन नव्हे तर तब्बल 14 कोटी 75 लाखांच्या नोटा जिल्हा मध्यवर्ती बँकेत धूळखात पडून आहेत. 

नोटा बदलून मिळण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेची उच्च न्यायालयात याचिका

बँकेतील नोटा सांभाळण्यासाठी बँकेला दैनंदिन कसरत करावी लागत आहे. रिझर्व बँकेकडून नोटा बदलून देण्यात याव्या यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून उच्च न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. 

122 कोटींच्या नोटा बदलून मिळाल्या नाहीत

या प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेप्रमाणेच राज्यातल्या आठ जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जुना नोटा अद्याप पडून आहेत. ज्याची एकूण रक्कम सुमारे 112 कोटी रुपये इतकी आहे. या जुन्या नोटा बदलुन मिळाव्यात म्हणून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा लढा आता न्यायालयामध्ये सुरू आहे.