'या' माजी आमदाराचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

 आटपाडीचे माजी आमदार सदाशिव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश 

Updated: Feb 14, 2020, 09:56 AM IST
'या' माजी आमदाराचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

रविंद्र कांबळे, झी मीडिया, खानापूर : आटपाडीचे माजी आमदार सदाशिव पाटील यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

ज्येष्ठ नेते सदाशिव पाटील हे खानापूर आटपाडी मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सदाशिव पाटील हे काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष होते. मात्र पाटील यांनी काँग्रेस पक्षाशी फारकत घेऊन चार महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत खानापूर आटपाडी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मिरजमध्ये झालेल्या मेळाव्यात हा प्रवेश झाला आहे.

प्रवेश सोहळ्या दरम्यान माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप केले असून काँग्रेस पक्षामध्ये कान भरणारांची संख्या फार जास्त आहे. त्यामुळे कान भरून चांगल्या माणसांना बदनाम केलं जातंय, मला ही बदनाम केले आहे.

त्या बदनामीला वैतागुणच मी पक्ष प्रवेश केलाय. पवार साहेब कान भरणाऱ्यांपासून सावध रहा अशी विनंती ही माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी शरद पवार यांना दिला आहे.