Exit Poll Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात बारामती लोकसभेची निवडणूक सर्वात लक्षवेधी आणि प्रतिष्ठेची ठरली. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरुद्ध सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात थेट लढत झाली. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या नणंद भावजयीच्या हाय व्होल्टेज लढाईकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. टीव्ही 9 -पोलस्ट्रॅट च्या एक्झिट पोलनुसार बारामतीत सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. तर, सुनेत्रा पवार या पिछाडीवर असल्याचे दाखवण्यात आले आहे.
बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार एकमेकांसमोर निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकलेत. नणंद विरुद्ध भावजय... सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यातली लढाई चांगलीच चर्चेत होती. सुनेत्रा पवारांविरोधात अख्खं पवार कुटुंब प्रचारासाठी मैदानात उतरले होते. अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर बारामतीत दोन पवार कुंटबातील दोन उमेदवार एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. सुनेत्रा पवार यांनी घड्याळ चिन्हावर निवडणुक लढवली तर, सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या तुतारी चिन्हावर निवडणुक लढवली. बारामतीमध्ये... कारण पवार कुटुंबामध्ये पडलेली फूट... आणि बारामती लोकसभा मतदारसंघातली बदललेली राजकीय परिस्थिती यामुळे ही लढत राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे.
दरम्यान, निकालापूर्वीच इंदापुरात सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर झळकले. सुप्रिया सुळे प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असं या बॅनरवर लिहिण्यात आलेलं आहे. ओबीसी सेल इंदापूर शहराध्यक्ष मयुर शिंदे या कार्यकर्त्याने हे बॅनर लावलेत.
(Desclaimer: 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या सर्व 7 टप्प्यांसाठी मतदान पूर्ण झाले असून 4 जून रोजी निकाल जाहीर होतील. त्याआधी, ZEE 24 Taas ने आपल्या दर्शकांसाठी एक मेगा एक्झिट पोल आणला आहे. या मेगा एक्झिट पोलमध्ये आम्ही देशातील अनेक मोठ्या एजन्सीचे एक्झिट पोल डेटा दाखवणार आहोत. दरम्यान झी 24 तास जी आकडेवारी दाखवेल ती वेगवेगळ्या एजन्सींच्या सर्वेक्षणातून मिळवलेली आकडेवारी आहे. ज्यासाठी 'झी 24 तास' जबाबदार नाही. हे आकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल नाहीत, फक्त एक्झिट पोल आहेत.)
ENG
471(113 ov)
|
VS |
IND
209/3(49 ov)
|
Full Scorecard → |
VAN-W
|
VS |
SAM-W
|
Vanuatu Women beat Samoa Women by 9 runs | ||
Full Scorecard → |
SAM-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Samoa Women by 4 wickets | ||
Full Scorecard → |
VAN-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Vanuatu Women by 35 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.