ऐतिहासिक शेतकरी संपाची आज वर्षपूर्ती, शेतकऱ्यांना काय मिळालं?

अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांब्यात गेल्या वर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन केलं होतं. त्या ऐतिहासिक संपाला आज एक वर्ष पूर्ण झालं.

Updated: Jun 1, 2018, 08:44 AM IST
ऐतिहासिक शेतकरी संपाची आज वर्षपूर्ती, शेतकऱ्यांना काय मिळालं? title=

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांब्यात गेल्या वर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन केलं होतं. त्या ऐतिहासिक संपाला आज एक वर्ष पूर्ण झालं.

गेल्यावर्षी केलेल्या संपामुळे खडबडून जाग्या झालेल्या सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली. त्यानुसार कर्जमाफीची प्रक्रिया सुरु झाली मात्र, शेतकरी आंदोलनातल्या मूळ हमीभावाच्या मागणीबाबत आजही कार्यवाही झालेली नाही. 

शेतकरी संपाच्या वर्षपूर्ती निमित्त पुणतांब्यात आज एक गट सरकारचं वर्षश्राध्द घालणार आहे. तर एक गट शेतकऱ्यांचा विजयोत्सव साजरा करणार आहे. आज राज्यभरातल्या तहसील कार्यालयात शेतकरी आपली भाकड जनावरं बांधून आंदोलन करणार आहेत.