पांडुरंग फुंडकर यांना आज अखेरचा निरोप

कृषीमंत्री पांडूरंग फूंडकर यांचं मुंबईत ह्रदयविकाराचा तीव्र झटक्यानं गुरूवारी आकस्मिक निधन झालं. बुधवारी अचानक छातीत दुखू लागल्यामुळे फुंडकर यांना सोमय्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. ते ६७ वर्षांचे होते. आज सकाळी ११ वाजता खामगाव इथे सिद्धिविनायक टेक्निकल विद्यालयात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Updated: Jun 1, 2018, 08:37 AM IST
पांडुरंग फुंडकर यांना आज अखेरचा निरोप title=

बुलडाणा : कृषीमंत्री पांडूरंग फूंडकर यांचं मुंबईत ह्रदयविकाराचा तीव्र झटक्यानं गुरूवारी आकस्मिक निधन झालं. बुधवारी अचानक छातीत दुखू लागल्यामुळे फुंडकर यांना सोमय्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. ते ६७ वर्षांचे होते. आज सकाळी ११ वाजता खामगाव इथे सिद्धिविनायक टेक्निकल विद्यालयात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पांडुरंग फुंडकर यांनी यापूर्वी भाजपाचं प्रदेशाध्यक्ष देखील भूषवलं होतं, विरोधीपक्ष नेतेपदाचं काम देखील त्यांनी पाहिलं होतं. पांडुरंग फुंडकर यांना भाऊसाहेब देखील म्हटलं जायचं. पांडुरंग फुंडकर हे भाजपाचे ज्येष्ठ नेते होते, शेतकरी नेते म्हणून त्यांची ओळख होती असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. राजीव गांधींच्या हत्येमुळे काँग्रेसची प्रचंड लाट असतानाही पुढील निवडणुकीतही अकोला लोकसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळविला होता.

पांडुरंग तथा भाऊसाहेब पुंडलिक फुंडकर हे भाजपाचे उमेदवार म्हणून नवव्या, दहाव्या आणि अकराव्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. पांडुरंग फुंडकर हे भाजपाचे प्रदेशाध्यक्षही होते. एकनाथ खडसे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस मंत्रीमंडळात त्यांना कृषीमंत्रीपद देण्यात आलं होतं. पांडुरंग फुंडकर यांच्या राजकीय कारकिर्दीला जनसंघापासून प्रारंभ झाला. आणीबाणीविरोधी आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. त्यामुळे त्यामुळे तुरुंगात जावे लागले. पुढे त्यांनी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले. त्यांनी कापसाच्या दरासाठी खामगाव ते आमगाव अशी पदयात्रा काढली होती.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x