बोंडअळीग्रस्त शेतक-यांना मदत नाहीच, शेतक-यांचा जीव टांगणीला

राज्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीविषयी केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळलेला नाही. त्यामुळं कापूस उत्पादक शेतक-यांचा जीव टांगणीला लागलाय. 

Updated: Feb 5, 2018, 06:48 PM IST
बोंडअळीग्रस्त शेतक-यांना मदत नाहीच, शेतक-यांचा जीव टांगणीला title=

मुंबई : राज्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीविषयी केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळलेला नाही. त्यामुळं कापूस उत्पादक शेतक-यांचा जीव टांगणीला लागलाय. 

पंचनामे अजून सुरूच

कृषी विभागातल्या सूत्रांच्या माहितीनुसार बोंडअलीग्रस्त शेतक-यांच्या नुकसानीबाबतचे पंचनामे अजून संपलेले नाहीत. तसंच केंद्र सरकारकडून मदतीबाबत प्रतिसाद नाही. हिवाळी अधिवेशनात बोंडअळीग्रस्त शेतक-यांना मतद जाहीर करण्यात आली होती. मात्र दीड महिना उलटला तरी मदत मिळालेली नाही.

अद्याप मदत मिळालीच नाही

बोंडअळीग्रस्त कोरडवाहू कापूस उत्पादकास प्रति हेक्टरी सरासरी ३० हजार ८०० रुपये इतकी मदत जाहीर केली होती. तर बागायत कापूस उत्पादक शेतकऱ्यास प्रति हेक्टरी सरासरी ३७ हजार ५०० रुपये इत मदत जाहीर केली होती. मात्र ही मदत अद्याप मिळालेली नाही.