Accident : तीन लेकरांना घेऊन बाईकवरुन घरी निघाले, पण वाटेतच... कुणीच वाचलं नाही; अंगावर काटा आणणारी घटना

Accident :  गोंदियाच्या रामनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढाकनी भागवत टोला रस्त्याजवळ हा भीषण अपघात घडला आहे. भरधाव ट्रकने मोटरसायकलला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की घटना स्थळी तिघांचा मृत्यू झाला तर एकाचा रूग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. 

Updated: Apr 1, 2023, 05:28 PM IST
Accident : तीन लेकरांना घेऊन बाईकवरुन घरी निघाले, पण वाटेतच... कुणीच वाचलं नाही; अंगावर काटा आणणारी घटना  title=

प्रविण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : लग्न सोहळ्यावरुन घरी निघालेल्या संपूर्ण कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. ट्रक आणि बाईकचा भीषण अपघात झाला (Accident). यात तीन मुलांचा आणि वडिलांचा मृत्यु आहे आहे. गोंदिया (Gondiya) येथे ही घटना घडली. घटनास्थळी तिघांचा मृत्यू झाला तर एकाचा रूग्णालयात मृत्यु झाला आहे. अपघातानंतर ट्रक चालक घटना स्थळावरुन फरार झाला आहे.

गोंदियाच्या रामनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढाकनी भागवत टोला रस्त्याजवळ हा भीषण अपघात घडला आहे. भरधाव ट्रकने मोटरसायकलला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की घटना स्थळी तिघांचा मृत्यू झाला तर एकाचा रूग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. 

आर्वी कमलेश तूरकर (वय 5 वर्षे), आदित्य बिसेन  (वय 7 वर्षे), मोहित बीसेन  (वय 11 वर्षे) आणि कुमेंद्र बिसेन  (वय 37 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. बीसेन हे दासगाव येथे राहणारे आहेत.  गोंदिया येथील पिंकेपार इथे लग्न सोहळ्या करिता बिसेन कुटुंबीय दासगाव वरून आले होते. लग्न सोहळा संपल्या नंतर ते  आपल्या मोटरसायकलने दासगाव येथे परत जात असताना भीषण अपघात झाला. 

ढाकणी ते भागवत टोला या रस्त्यावर त्यांच्या बाईकला ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती. की त्या धडकेत घटनास्थळी दोन मुलांचा व ३७ वर्षी बिसेन यांचा मृत्यू झाला. अपघाता नंतर ट्रक चालत घटना स्थळावरून फरार झाला. 
याची माहिती रामनगर पोलीसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रूग्णालयात दाखल केले. तर, ट्रक चालकाविरोधात रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.