मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांची आत्महत्या, चंद्रपूरमधली हृदयद्रावक घटना

चंद्रपूर शहरातील समाधी वॉर्ड परिसर आज एका आत्महत्येच्या घटनेने हादरला.

Updated: Jun 20, 2018, 09:36 PM IST
मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांची आत्महत्या, चंद्रपूरमधली हृदयद्रावक घटना

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील समाधी वॉर्ड परिसर आज एका आत्महत्येच्या घटनेने हादरला. संतोष दीक्षित या ५२ वर्षीय इसमाने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केली. संतोष दीक्षित यांच्या ६ वर्षीय समिधा या मुलीचा २२ एप्रिलला घरीच कूलर चा शॉक लागून मृत्यू झाला होता. एकुलत्या एका मुलीचा मृत्यू झाल्याने दीक्षित दाम्पत्य अतिशय दुःखात होते. हाच मानसिक आघात सहन न झाल्याने संतोष यांनी मंगळवारी रात्री आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली.

या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होतेय. मुलीच्या मृत्यूमुळे पती-पत्नी नैराश्यात होते. काही दिवसापासून संतोष दीक्षित यांनी अन्नत्याग केला होता. अखेर त्यांनी आत्महत्या केली. संतोष दीक्षित यांनी लिहिलेली एक भावनात्मक तीन पानी सुईसाईड नोट घरात सापडली. यात आत्महत्येसाठी कुणीही जबाबदार नसल्याचं त्यांनी नमूद केलंय. आपण व्यथित झालो असून मुलगी समिधाकडे जात असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटलंय.