पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्ये

उत्साह आणि चैतन्याचे बारा दिवस अनुभवल्यानंतर आता दिवस आलाय तो बाप्पाला निरोप देण्याचा गणेशोत्सवाची सांगताही तितक्याच उत्साहात करण्यासाठी पुण्यातील मंडळं सज्ज झाली आहेत. याहीवर्षी मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन कृत्रिम हौदात केले जाणार आहे. 

Updated: Sep 5, 2017, 10:36 AM IST
पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्ये title=

पुणे : उत्साह आणि चैतन्याचे बारा दिवस अनुभवल्यानंतर आता दिवस आलाय तो बाप्पाला निरोप देण्याचा गणेशोत्सवाची सांगताही तितक्याच उत्साहात करण्यासाठी पुण्यातील मंडळं सज्ज झाली आहेत. याहीवर्षी मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन कृत्रिम हौदात केले जाणार आहे. 

मानाचा पहिला कसबा गणपती 

पुण्यातील मिरवणुकीला सकाळी 10.30 वाजता सुरूवात होईल. मंडईजवळील टिळक पुतळा येथून चांदीच्या पालखीतून मानाच्या पहिला कसबा गणपतीची मिरवणुक मार्गस्थ होईल. सनई वादन, नगारा वादन, प्रभात बॅंड यांच्यासह कामायनी विद्यामंदिराचं ढोलताशा पथक आणि महिलांचं ढोलताशा पथक हे या मिरवणुकीचं वैशिष्ट्य असेल.

मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती  

सतीश आढाव यांचं नगारावादन, अश्वपथक, ईशान्य राज्यातील विद्यार्थ्यांच्या लोककला, शिवमुद्रा, शौर्य आणि ताल ही ढोलताशा पथकं आणि पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या लवाजम्यासाह तांबडी जोगेश्वरी मंडळाची मिरवणूक मार्गस्थ होईल.

मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळ 

फुलं आणि पारंपारिक वाद्यांनी सजवलेल्या रथातून श्रींची मिरवणूक निघेल. नादब्रम्ह, शिवगर्जना आणि चेतक स्पोर्टस क्लब ही ढोलपथकं आणि नगारावादनाच्या ठेक्यात ही मिरवणूक निघेल.

मानाचा चौथा तुळशीबाग गणपती

तब्बल 24 फूट उंचीच्या फुलांच्या रथात बाप्पाची हेमाडपंथी मुर्ती विराजमान होईल. ताल, गजलक्ष्मी, स्वरुपवर्धिनी या ढोलताशा पथकांसह, विद्यार्थ्यांची मल्लखांब प्रात्यक्षिकं मिरवणुकीची शोभा वाढवतील.
 
मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती

पारंपारिक आणि धार्मिक पध्दतीने मिरवणूक काढण्याची परंपरा केसरी वाडा गणपती मंडळानं कायम ठेवली आहे. बिडवे बंधूंचे सनईवादन, शिवमुद्रा आणि श्रीराम ढोलताशा पथकं या मिरवणुकीत सहभागी होतील.

ज्या प्रमाणे मानाच्या पाच गणपतीची मिरणूक हे पुण्याच्या मिरवणुकीचं खास वैशिष्ट्य असतं त्याच प्रमाणे रात्री सुरु होणा-या भाऊ रंगारी, मंडई आणि दगडूशेठ गणपतीची मिरवणुक हे रात्रीच्या मिरवणुकांचं खास आकर्षण असणार आहे.