नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या वादग्रस्त मुख्य अग्निशमन दलाधिकारी अनिल महाजन यांच्यावर गैरशिस्त वर्तनाबद्दल १ लाख रुपये दंड ठोठावण्यात आलाय. त्यासह नवीन नाशिक विभागातील १ वरिष्ठ लिपीक, पश्चिम विभागातील १ वायरमन आणि पंचवटी विभागातील १ शिपाई असं तीन जणांना निलंबित करण्यात आलंय. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिक महापालिकेत शिस्तप्रिय परंपरा कायम राखलीय. यामुळे महापालिकेतील मनमानीला चाप बसणार आहे.