अहमदनगरमध्ये रूग्णालयात अग्नितांडव! 10 जणांची प्रकृती चिंताजनक

अहमदनगरमध्ये रूग्णालयात भीषण आग लागली आहे.

Updated: Nov 6, 2021, 01:15 PM IST
अहमदनगरमध्ये  रूग्णालयात अग्नितांडव! 10 जणांची प्रकृती चिंताजनक title=

अहमदनगर : अहमदनगरमध्ये रूग्णालयात भीषण आग लागली आहे. जिल्हा रूग्णालयात ही आग लागली असून सकाळी 10 वाजता आगीचा भडका उडालाय. मिळालेला माहितीनुसार, या आगीत 2-3 जणं दगावली आहेत. तर या आगीमुळे 10 जणं जखमी असल्याची माहिती आहे. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आयसीयू वॉर्डामध्ये ही आग लागली आहे. ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी एकूण 20 रुग्ण उपचार घेत होते. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. तातडीने अधिकाऱ्यांनी त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. 

दरम्यान आग भीषण असून 2 ते 3 जणं दगावल्याची माहिती आहे. शिवाय मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय.