अंत्यविधीदरम्यान आगीचा भडका, पुण्यातील धक्कादायक प्रकार

अंत्यविधी दरम्यान आगीचा भडका उडाल्याने 11 जण जखमी झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. मृतदेहावर पेट्रोल टाकल्यामुळे आगीचा भडका उडाला. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांवर उपचार सुरु आहेत.

Updated: Apr 30, 2022, 10:40 PM IST
अंत्यविधीदरम्यान आगीचा भडका, पुण्यातील धक्कादायक प्रकार title=

पुणे : शहरात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. अंत्यविधी दरम्यान आगीचा भडका उडाला. या आगीच्या भडक्यात 11 जण जखमी झाले आहेत. या जखमी झालेल्यांवर उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहेत. 

 

नक्की काय झालं? 

अंत्यविधीदरम्यान प्रेतावर अग्नीसाठी पेट्रोल टाकण्यात आला. साधरणपणे मुखाग्नी देताना रॉकेलचा वापर केला जातो. मात्र मृतदेहावर पेट्रोल टाकल्याने भडका उडाला.  कैलास स्मशानभूमीतील ही घटना आहे. 

यामध्ये पेट्रोलच्या भडक्यात 11 जण जखमी झाले. या जखमींवर ससून मध्ये उपचार सुरू आहेत.