शिवसेना गटनेत्याच्या केबिनमध्ये आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  

Updated: Jan 22, 2021, 02:14 PM IST
शिवसेना गटनेत्याच्या केबिनमध्ये आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

नाशिक : महानगरपालीकेतील शिवसेना गट नेत्याच्या केबिनमध्ये आग लागली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज सध्या वर्तवण्यात आला आहे. आग लागल्यामुळे नाशिक नगरपालिकेची व्यवस्था ऐरणीवर आली आहे. महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयाला ही आग लागली. तर आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. 

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शिवाय या आगीत किती नुकसान झालं हे कळू शकलेलं नाही. याप्रकणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगीची माहिती घेतली असून दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत.