पुणे : पुण्यामध्ये पुन्हा एकदा एका एटीएम सेंटरला आग लागली आहे. वारजे इधल्या गणपती माथ्याजवळ मध्यरात्री दोन वाजता एक इलेक्ट्रिक दुकान आणि दुकानातच असलेलं एटीएम केंद्र आगीत जळून खाक झालं.
या दुकानातलं आयसीआयसीआयचं एटीएम मशीन यात पुर्णपणे जळून भस्मसात झालं. दरम्यान या एटीएममध्ये काही तासांपूर्वीच रोकड भरली गेली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे पुण्यातल्याच सहकारनगरमध्येही जनता सहकारी बँकेच्या ATM ला २५ नोव्हेंबरला सकाळी नऊच्या सुमाराला आग लागली होती. ती आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं खरं, मात्र या आगीत एटीएममधली सर्व रोकड जळून खाक झाली होती. दरम्यान एका आठवड्यामधल्या या दोन घटनांमुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.