धक्कादायक : आंतरजातीय विवाह केला म्हणून १५ कुटुंब वाळीत

आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून १५ कुटुंबांना वाळीत टाकण्यात आल्याचा प्रकार पुण्यात समोर आलाय. 

Updated: Jul 18, 2017, 01:20 PM IST
धक्कादायक : आंतरजातीय विवाह केला म्हणून १५ कुटुंब वाळीत

पुणे : आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून १५ कुटुंबांना वाळीत टाकण्यात आल्याचा प्रकार पुण्यात समोर आलाय. 

या कुटुंबांनी तेलगू मडेलवार परिट सामाजाच्या पंचाविरूद्ध तक्रार दिलीय. त्यानुसार समाजाच्या पंचांच्या विरोधात कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पुढाकारातून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

विशेष म्हणजे राज्यात ३ जुलैपासून 'सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा' लागू झालाय. त्या कायद्यानुसार झालेली ही राज्यातील पहिलीच कारवाई आहे. 

समाजातील पंचांवर कारवाई करावी तसेच आपल्याला विनाअट जातीमध्ये परत घेण्यात यावं, अशी बहिष्कृत कुटंबांची मागणी आहे.