अलिबाग : खोल समुद्रातल्या मासेमारीवरील निर्बंध उठलेत. त्यामुळे मच्छिमारांनी आपल्या बोटी समुद्रात लोटल्यात. रायगड जिल्ह्यातल्या विविध बंदरातून काही बोटी मासेमारीसाठी रवाना झाल्यात. तर काही बोटींची निघण्यासाठीची तयारी सुरु आहे. माशांचा प्रजनन काळ लक्षात घेऊन पावसाळ्यात मासेमारीला बंदी असते. जून आणि जुलै अशा दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मासेमारीवरील निर्बंध उठल्याने कोळी बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.