"तुझ्या पतीला माझ्याकडे पाठव, नाहीतर...," तरुणीची महिलेला धमकी; जळगावातील हादरवणारी घटना

Maharashtra News: तुझ्या पतीला माझ्याकडे पाठव, अन्यथा त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी एका तरुणीने विवाहित महिलेला दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगावात (Jalgaon) ही घटना घडली असून, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 17, 2023, 11:26 AM IST
"तुझ्या पतीला माझ्याकडे पाठव, नाहीतर...," तरुणीची महिलेला धमकी; जळगावातील हादरवणारी घटना title=

Maharashtra News: तुझ्या पतीला माझ्याकडे पाठव, अन्यथा त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी एका तरुणीने विवाहित महिलेला दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगावात (Jalgaon) ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणीचे महिलेच्या पतीशी प्रेमसंबंध होते. दरम्यान, यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत तरुणीविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसीच्या हद्दीत ही घटना घडली आहे. 

संबंधित तरुणीचे आणि महिलेच्या पतीचे प्रेमसंबंध होते. लग्न होण्याआधी त्या दोघांमध्ये संबंध होते. पण लग्न झाल्यानंतरही तरुणी त्याला सोडण्यास तयार नव्हती. यामुळे ती त्याच्या मागे लागली होती. सदर तरुणी आपल्या माजी प्रियकराच्या पत्नीला वारंवार फोन करत असे. यातून अनेकदा तिने महिलेला शिवीगाळदेखील केली होती. 

सततच्या फोन आणि धमक्यांना कंटाळून तक्रारदार महिलेने तरुणीचा नंबर ब्लॉक केला होता. त्यानंतर तरुणीने दुसऱ्या क्रमांकावरुन तिच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली होती. महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत याची माहिती दिली आहे. 

महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सांगितलं आहे की, 14 जुलै रोजी तरुणी आपल्या घऱी आली होती. यावेळी तिने आपल्याकडे पती कुठे आहे? अशी विचारणा केली होती. तसंच त्याला माझ्याकडे पाठव नाही तर त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिल्याचा आरोप केला आहे. तरुणीने धमकावत सांगितलं होतं की, बलात्काराचा गुन्हा दाखल करत मी त्याची नोकरीही काढून घेईन. 

तरुणीने बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसंच तरुणीने मला पाच लाख रुपये द्या अशी मागणी करत मारहाण केल्याचा आरोप आहे. महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.