माजी अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांच्यावर आज अंत्यसंस्कार

ज्येष्ठ काँग्रेस नेते शांताराम पोटदुखे यांचं निधन

Updated: Sep 24, 2018, 10:38 AM IST
माजी अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांच्यावर आज अंत्यसंस्कार title=

नागपूर : माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री, चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे सलग 4 वेळा खासदार राहिलेल्या ज्येष्ठ काँग्रेस नेते शांताराम पोटदुखे यांचं नागपूरच्या खाजगी रुग्णालयात निधन झाले होते. रात्री उशिरा त्यांचे पार्थिव चंद्रपूर येथील निवासस्थानी आणले गेले. सकाळी 11 वाजता शांतीधाम स्मशानभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, महासचिव अशोक गेहलोत आणि काँग्रेसच्या मान्यवर नेत्यांची याप्रसंगी उपस्थिती राहणार आहे. अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेल्या शांतारामबापू यांनी जिल्हा आणि देश समाजासाठी केलेल्या कार्याची गौरवपूर्ण आठवण याप्रसंगी नेत्यांनी केली.