शाहूवाडी पोलीस स्टेशनमधून चार कैदी फरार

शाहूवाडी पोलीस स्टेशनमधून ४ कैदी पळाल्याची घटना घडलीय.  

Updated: May 18, 2018, 06:37 PM IST
शाहूवाडी पोलीस स्टेशनमधून चार कैदी फरार  title=

कोल्हापूर : शाहूवाडी पोलीस स्टेशनमधून ४ कैदी पळाल्याची घटना घडलीय. चोरीच्या आरोपाखाली कळंबा जेलमध्ये असलेल्या या ४ आरोपींना अधिक चौकशीसाठी शाहुवाडी पोलिस स्टेशनमध्ये आणले होते. आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास चौघेही लोखंडी गज तोडून पोलिसांच्या तावडीतून फरार झाले.  

चोरीच्या आरोपाखाली कळंबा जेलमध्ये असलेल्या या ४ आरोपींना अधिक चौकशीसाठी शाहुवाडी पोलीस स्टेशनमध्ये आणले होते. घरफोडी केल्याप्रकरणी त्यांना २० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास चौघेही लोखंडी गज तोडून फरार झाले आहेत.  पळून गेलेले चौघेही एकाच टोळीचे आहेत.

 गज तोडून पळ काढल्याची बाब लक्षात येताच पोलिसांचे एक पथक त्यांचा शोध घेत आहे. तसंच अनेक ठिकाणी नाकाबंदीही करण्यात आली आहे.  सुरज डबडे ( २२, रा. वाठार, जि. कोल्हापूर ), ओंकार सूर्यवंशी ( १९, रा. कासेगाव, जि. सांगली), गोविंद माळी (१९, रा. कासेगाव, जि. सांगली), विराज कारंडे (१९, रा. पाडळी दरवेज, जि. कोल्हापूर) हे फरार झाले असून त्यांच्यावर गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.