दोन महिलांमध्ये फ्रिस्टाईल हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

दोन महिलांमध्ये फ्रिस्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. 

Updated: Aug 31, 2019, 10:11 PM IST
दोन महिलांमध्ये फ्रिस्टाईल हाणामारी, व्हिडिओ व्हायरल title=

कोल्हापूर : शहरातील महाद्वार मार्गावर दोन महिलांमध्ये फ्रिस्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. या महिलांचे भांडण सोडवताना स्थानिकांची पुरती दमछाक झाली. मार्केटमध्ये हा सगळा प्रकार घडल्याने बघ्यांनी एकच गर्दी केली होती. महिलांच्या हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे भांडण सोडविणार कसे, अशी चर्चा तेथे सुरु होती. त्याठिकाणी महिला कमी होत्या. तसेच उपस्थित महिला त्यांचे भांडण सोडविण्यासाठी पुढे येत नव्हत्या. पुरुष मंडळीनाही भांडण सोडवायचे कसे, असा प्रश्न पडला होता. मात्र, एकाने मध्यस्थी करताना दिसत आहे. परंतु दुसऱ्या महिलेने केस पकडत महिलेला मारहाण केली. हा सर्व प्रकार उपस्थित लोक पाहत होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झालाय.