तीन मित्रांनी शेवटच्या श्वासापर्यंत मैत्री निभावली....मृत्यूनंही तिघांना एकत्रच गाठलं

मैत्रीला कुणाची नजर लागणार नाही म्हणता म्हणता काळाचीच लागली आणि...

Updated: Feb 13, 2022, 01:26 PM IST
तीन मित्रांनी शेवटच्या श्वासापर्यंत मैत्री निभावली....मृत्यूनंही तिघांना एकत्रच गाठलं title=

लैलेश बारगजे, झी 24 तास, श्रीगोंदा : आपल्या मित्राला घरी सोडण्यासाठी निघालेले मित्र पुन्हा घरी परतलेच नाहीत. ही दोस्ती शेवटच्या श्वासापर्यंत तुटायची नाही अशा आणाभाका घेणारे अनेक असतात. पण या मित्रांनी तर शेवटच्या श्वासापर्यंत ही मैत्री सांभाळली. या तिन्ही मित्रांनी अखेरचा श्वासही एकसाथ घेतला.

मित्राला सोडण्यासाठी जात असताना ऊसाच्या ट्रॉलीला कारची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रॉलीच्या धडकेत कारचा चुराडा झाला. फोटो पाहून लक्षात येईल की अपघात किती भयंकर झाला असावा. अपघात झालेले तिन्ही खास मित्र असल्याची माहिती मिळाली आहे. 

नेमकं काय घडलं?
दोन मित्र आपल्या मित्राला घरी सोडण्यासाठी कारने जात होते. त्यावेळी मृत्यूनं त्यांना रस्त्यात गाठलं. श्रीगोंदा इथून काष्टीला जात असताना काळानं घात केला. कारची धडक उसाच्या ट्रॉलीला बसली. या अपघातात तीन मित्रांनी आपला जीव गमवला आहे. 

या अपघातात राहुल आळेकर, केशव सायकर आणि आकाश खेतमाळीस या तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचं नेमकं समोर येऊ शकलं नाही. श्रीगोंदा ते दौंड हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा आणि मोठ असल्याने वाहनांची गती अधिक असते. 

तालुक्यातील साखर कारखान्यांचा गळित हंगाम सुरु आहे ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला मागच्या बाजूने रिफ्लेक्टर नसल्याने अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघातामुळे तीन कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.