Nashik News: जिथं धतिंग केली त्याच जागेवर पोलिसांनी उतरवला माज; पाहा CCTV VIDEO!

Vadapav seller attacked by mob: गेल्या आठवड्यात मद्यधुंद टोळक्याने वडापावच्या गाडीवर राडा घातला होता. नाशिकरोड येथील शाहुपथावर (Nashik road) ही घटना घडली होती. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. 

Updated: Dec 1, 2022, 10:31 PM IST
Nashik News: जिथं धतिंग केली त्याच जागेवर पोलिसांनी उतरवला माज; पाहा CCTV VIDEO! title=
Gang Beat Up A VadaPav Seller

Nashik News: दिवसेंदिवस राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं दिसतंय. अनेक हत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसतंय. अशातच काही दिवसांपूर्वी नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर (Attack on a vada pav seller in Nashik) आली होती. एका वडापाव विक्रेत्यावर भरदिवसा कोयत्यानं हल्ला झाल्याची (Vadapav seller attacked by mob) घटना घडली होती. त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. अशातच याच जागेवरचा आणखी एक व्हिडीओ  (CCTV Video) सध्या व्हायरल होतोय. (Gang Beat Up A VadaPav Seller Now The Police Took Them To The Same Place And Beat Up The Gang marathi news)

गेल्या आठवड्यात मद्यधुंद टोळक्याने वडापावच्या गाडीवर राडा घातला होता. नाशिकरोड येथील शाहुपथावर (Nashik road) ही घटना घडली होती. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. विशाल गोसावी (Vishal Gosawi) असं वडापाव विक्रेत्याचं नाव होतं. खुन्नसने बघतोय म्हणून आरोपींनी हल्ला चढवला होता. त्यानंतर आता नाशिकमध्ये (Nashik News) खाकीची शिस्त पहायला मिळाली.

आणखी वाचा - Viral Video: संतापजनक! LIVE व्हिडिओ करताना कोरियन महिलेचा मुंबईत विनयभंग

हल्ल्यांनंतर ताब्यात आलेल्या संशयितांची नाशिक रोड पोलिसांनी धिंड काढली. धतिंग करणाऱ्या टोळीला अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपींची धिंड काढली. ज्या वडापावच्या गाड्यावर हल्ला झाला होता. त्याचठिकाणी आरोपींना नेण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी काठी चालवत चांगलाच धडा शिकवला. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे.

पाहा Video -

दरम्यान, हल्ला होताच वडापावच्या गाड्याजवळ असलेले नागरिक घाबरले आणि त्यांनी तेथून पळ काढला होता. सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध घेतला. त्यानंतर समाजामधील भितीचं वातावरण निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी धाडसाचा निर्णय घेतला आणि आरोपींची धिंड काढली.