बाप्पाचे आगमन : कोकणात जाण्यासाठी आणखी 40 अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या

Ganpati Special Trains : गणपती उत्सवाकरीता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे 40 अतिरिक्त विशेष ट्रेन चालविणार आहे. 

Updated: Aug 6, 2021, 08:16 AM IST
बाप्पाचे आगमन : कोकणात जाण्यासाठी आणखी 40 अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या

मुंबई : Ganpati Special Trains : गणपती उत्सवाकरीता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे 40 अतिरिक्त विशेष ट्रेन चालविणार आहे.  गणपती उत्सव 2021 साठी आधी घोषित केलेल्या 72 उत्सव विशेष ट्रेन व्यतिरिक्त या विशेष ट्रेन आहेत. ( 40 more Running of Additional Ganpati Special Trains to go to Konkan)

 1. मुंबई- सावंतवाडी रोड विशेष (2 फेऱ्या)  

01235 विशेष गाडी  - 7 सप्टेंबर 2021 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 13.10 वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी 2.00 वाजता  पोहोचेल.
01236 विशेष गाडी  - 10. सप्टेंबर 2021 रोजी सावंतवाडी रोड येथून 2.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे त्याच दिवशी 14.00 वाजता पोहोचेल.

थांबा : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ

2.  पनवेल- सावंतवाडी रोड विशेष (4 फेऱ्या) 

01237 विशेष गाडी  - 8 सप्टेंबर 2021 आणि  9 सप्टेंबर 2021 रोजी पनवेल येथून 14.10 वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी  2.00  वाजता पोहोचेल. 
01238 विशेष गाडी  - 8 सप्टेंबर 2021 आणि 9 सप्टेंबर 2021 रोजी सावंतवाडी रोड येथून 2.30 वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी 12.00 वाजता पोहोचेल.

थांबा : रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ.

3. लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव विशेष (6 फेऱ्या) 

01239 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. 5 सप्टेंबर 2021 रोजी, 7 आणि 9 सप्टेंबर 2021 रोजी 5.33 वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी 20.20 वाजता पोहोचेल.  
01240 विशेष मडगाव येथून दि.5 सप्टेंबर 2021 रोजी, 7 आणि 9 सप्टेंबर 2021 रोजी 20.30 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 10.30 वाजता  पोहोचेल.

थांबा: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी. 

4. लोकमान्य टिळक टर्मिनस- कुडाळ विशेष (6 फेऱ्या)  

01241 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ३.९.२०२१, ७.९.२०२१ व १०.९.२०२१ रोजी ००.४५ वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी ११.२० वाजता पोहोचेल. 
01242 विशेष कुडाळ येथून दि. ५.९.२०२१, ८.९.२०२१ व १२.९.२०२१ रोजी १२.१० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी २३.५५ वाजता पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग. 

5. पनवेल-कुडाळ विशेष (6  फेऱ्या)  

01243 विशेष पनवेल येथून दि. ४.९.२०२१, ८.९.२०२१ व ११.९.२०२१ रोजी  ००.१५ वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी ११.२० वाजता  पोहोचेल.  
01244 विशेष कुडाळ येथून दि. ३.९.२०२१, ७.९.२०२१ व १०.९.२०२१ रोजी  १२.१० वाजता  सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी २३.१० वाजता पोहोचेल. 

थांबा: रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.

6. पनवेल- कुडाळ विशेष (4 फेऱ्या)  

01245 विशेष पनवेल येथून दि. ५.९.२०२१ आणि १२.९.२०२१ रोजी ००.१५ वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी ११.२० वाजता  पोहोचेल.  
01246 विशेष कुडाळ येथून दि. ४.९.२०२१ आणि ११.९.२०२१ रोजी १२.१० वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी  २३.०० वाजता पोहोचेल.

थांबा: रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग. 

7. पुणे- मडगाव/करमळी- पुणे विशेष (२ फेऱ्या)  

01247 विशेष दि.८.९.२०२१ रोजी पुणे येथून १८.४५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी १०.०० वाजता पोहोचेल. 
 01248 विशेष करमळी येथून दि. १०.९.२०२१ रोजी १५.१० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५.५०  वाजता पोहोचेल. 

थांबा: लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी. 

8. पनवेल - करमळी/मडगाव- पनवेल विशेष (2 फेऱ्या) 

01249 विशेष पनवेल येथून दि.१०.९.२०२१ रोजी ००.१५ वाजता सुटेल आणि करमळी येथे त्याच दिवशी १४.१५ वाजता पोहोचेल.  
01250 विशेष मडगाव येथून दि. ९.९.२०२१ रोजी ११.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी  २३.०० वाजता पोहोचेल. 

थांबा: रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी.

आधी घोषित केलेल्या गणपती उत्सव विशेष ट्रेनच्या अतिरिक्त फेऱ्या असणार आहेत. तर वर नमूद विशेष ट्रेन व्यतिरिक्त, आधीच जाहीर केलेल्या विशेष ट्रेनच्या अतिरिक्त फेऱ्या (8) खालील प्रमाणे चालविण्यात येतील. यात यांचा समावेश आहे, 01227 मुंबई- सावंतवाडी रोड विशेष दि. 4 सप्टेंबर 2021 रोजी आणि 01228 सावंतवाडी रोड-मुंबई विशेष दि. 4 सप्टेंबर 2021 रोजी .