गॅस दरवाढ : राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्या आक्रमक, गोवऱ्यासह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

डिझेल-पेट्रोल (Diesel-petrol) पाठोपाठ आता गॅसचे दर वाढले (Gas price hike) आहेत या दरवाढीच्या विरोधात  राष्ट्रवादी महिलांनी आंदोलन केले.

Updated: Feb 6, 2021, 02:10 PM IST
गॅस दरवाढ : राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्या आक्रमक, गोवऱ्यासह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक  title=

विष्णू बुरगे / बीड : डिझेल-पेट्रोल (Diesel-petrol) पाठोपाठ आता गॅसचे दर वाढले (Gas price hike) आहेत या दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्रभर यामध्ये महिला आंदोलन करत आहेत. बीडच्या (Beed) राष्ट्रवादी काँग्रेस महिला (NCP women) कार्यकर्त्या आज चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेणाच्या गोवऱ्या घेऊन पोहोचल्या. गॅसची झालेली दरवाढ यामुळे महिला त्रस्त झालेले आहेत. घर खर्चाचे बजेट कोलमडत आहे. त्यामुळे पुन्हा आम्हाला पारंपरिक पद्धतीने चूल पेटविली लागेल. याची आतापासूनच तयारी सुरू केली असल्याचा आंदोलन महिलांनी म्हटले आहे. यावेळी या आंदोलक महिलांनी जोरदार घोषणा दिल्यात. (NCP women activists' agitation at Beed)

पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात आज ओरड होत असताना महिला देखील त्याच दरवाढीमुळे हैराण झालेल्या आहेत. उज्वला गॅस योजनेमधून अनेक ठिकाणी खास दिलेला आहे मात्र त्याच्या किमती वाढल्यामुळे ते घेणे परवडत नसल्याचे महिलांनी सांगितलं त्यामुळे घराघरात जरी असला तरी तो भरणे परवडत नसल्यामुळे आता गॅस न वापरता पारंपरिक पद्धतीने चूल पेटवण्याची वेळ महिलावर ओढावली असल्याचे आंदोलक महिलांनी सांगितले.

मोदी सरकारने जे पेट्रोल-डिझेल सह गॅसचे भाव वाढवले आहेत गॅसचा भाव 600 होता, तो आता 725 पर्यंत पोहोचला आहे. मोदी सरकारकडून उज्वला गॅस योजनेचे गाजर दाखवण्यात आले होते. उज्वला योजनेतून ज्या महिलांना सिलिंडर दिले आहेत. मात्र, त्याचा उपयोग काय? गॅसच्या किंमती वाढलेल्या आहेत. केंद्र सरकारने तात्काळ गॅसचे दर कमी करावेत, अन्यथा महिलांना पुन्हा चूल पेटवाव्या लागतील. काही महिनांनी चूल पेटविण्यास सुरुवात केली आहे. आता गॅससाठी पैसे नसल्यान चूल पेटविण्यासाठी गोवऱ्यांचा वापर करावा लागणार. त्यामुळे आम्ही या गोवऱ्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली आहे. या गोवऱ्या घेऊन सरकारच्या गॅस दरवाढीचा निषेध व्यक्त केला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या हेमा पिंपळे म्हणाल्या.

केंद्र सरकारने जे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढलेले आहेत. त्यामुळे जनता होरपळून निघत आहे. आम्ही गोवऱ्या घेऊन हातामध्ये त्याचा निषेध व्यक्त केला. मोदींनी महिलांची  व्यथा जाणून घेतली पाहिजे. केवळ उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून महिलांना गॅस देऊन त्याचा उपयोग होणार नाही. वाढलेल्या किमतीमुळे गॅस वापरणे आता शक्य नाही त्यामुळे पुन्हा चूल पेटवण्याची वेळ महिलावर ओढवली असल्याच मत अॅड प्रज्ञा खोसरे यांनी व्यक्त केले.