अलिबागचा पांढरा कांदा, नंदुरबारची मिरची; काष्टीची कोथिंबीर जाणार सातासमुद्र

GI Rating News : अलिबागचा पांढरा कांदा, नंदुरबारची मिरची, काष्टीची कोथिंबीर यांना जीआय मानांकन मिळण्याची शक्यता आहे. 

Updated: Feb 19, 2022, 01:46 PM IST
अलिबागचा पांढरा कांदा, नंदुरबारची मिरची; काष्टीची कोथिंबीर जाणार सातासमुद्र title=

रायगड : GI Rating News : अलिबागचा पांढरा कांदा, नंदुरबारची मिरची, काष्टीची कोथिंबीर यांना जीआय मानांकन मिळण्याची शक्यता आहे. राज्यातून जीआय मानांकनासाठी राज्यातून 10 प्रस्ताव पाठवण्यात आलेत. (GI rating to Alibag's white onion, Nandurbar's chilli and Kashti's cilantro)

या प्रस्तावांमध्ये उस्मानाबादचा बोकड, जुन्नर तालुक्यातला शिवनेरी हापूस यांचाही समावेश आहे. चेन्नईतल्या एका संस्थेच्यावतीने ही मानांकनं दिली जातात. या संस्थेकडे दहा प्रस्ताव दाखल झालेत.

पालघरमधील वाडा कोलम, नंदूरबारमधील आमचूर आणि मिरची, पंची चिंचोळी चिंच, बोरमुरी डाळ यांचाही प्रस्ताव पाठवण्यात आलाय. हे मानांकन मिळाल्यावर या सर्व उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळेल. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल, अशी शक्यता जास्त आहे.