खान्देशात रखडलेल्या सिंचन प्रकल्पांची गिरीश महाजनांकडून पाहणी

जलसंपदामंत्र्यांकडून कामाची पाहणी

Updated: Jun 30, 2018, 10:26 PM IST
खान्देशात रखडलेल्या सिंचन प्रकल्पांची गिरीश महाजनांकडून पाहणी title=

धुळे : खान्देशात रखडलेल्या दोन सिंचन प्रकल्पांपैकी एक असलेल्या शेळगाव प्रकल्पाची पाहणी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केली. दोन्ही प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचाई तसंच बळीराजा योजनेत समाविष्ट करण्यासाठी शासनाचे प्रयत्न असल्याची माहिती महाजन यांनी यावेळी दिली. दरम्यान राज्याचं सिंचनाचा बजेट फक्त ८२०० कोटी असून रखडलेल्या पाडळसरे तसंच शेळगाव प्रकल्पाची किंमत २ हजार कोटींच्या वर आहे. त्यामुळे सध्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक काम झालेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याकडे शासनाचा कल असणार आहे. तूर्तास या प्रकल्पांचे काम जरी सुरू असलं तरी निधीची कमतरता असल्याची कबुली गिरीश महाजन यांनी यावेळी दिली आहे.