close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

शिक्षणासाठी पैसे नसल्याने बारावीतील मुलीची आत्महत्या

इयत्ता बारावीमध्ये शिकणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केली.  

Updated: Jan 12, 2019, 11:10 PM IST
शिक्षणासाठी पैसे नसल्याने बारावीतील मुलीची आत्महत्या

नांदेड : इयत्ता बारावीमध्ये शिकणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केली. नांदेडमध्ये ही घटना घडली. शहरातील दीपक नगर भागात राहणाऱ्या अनुजा कांबळे या तरुणीने आपल्या घरात गळफास लावला. धक्कादायक म्हणजे शिक्षणासाठी पैसे नसल्याने तिने निराशेतून आत्महत्या केल्याचे पुढे येत आहे. तशी तिने चिठ्ठी लिहिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिच्या या निर्णयानंतर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

अनुजाच्या वडीलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. आपल्या आई आणि एका भावासह ती राहत होती. अनुजा बारावी विज्ञान शाखेत शिकत होती. वडील नसल्याने तिच्या शिक्षणाची जबाबदारी आईवर आली होती. शिक्षणाचा खर्च आईला झेपत नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे तिने आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत म्हटल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. घटनेचा अधीक तपास पोलीस करत आहेत.